महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Groom travels via Helicopter : लग्नासाठी नवरदेव हेलिकॉप्टरमधून रवाना - Former Mayor of Meera Bhynder

मीरा भाईंदर येथील गोडदेव गावा मधील म्हात्रे कुटुंबातील (Mhatre Wedding) रोशन म्हात्रे यांचा लग्न सोहळा डोंबिवली येथे संपन्न होणार आहे.याठिकाणी नवरदेव रोशन म्हात्रे हे खाजगी हेलिकॉप्टर मधून डोंबिवलीकडे (Groom travels via Helicopter) रवाना झाले आहे.

Groom travels via Helicopter
Groom travels via Helicopter

By

Published : Dec 13, 2021, 6:42 PM IST

मीरा भाईंदर :- हौस म्हटलं की माणूस काय करेल यांचा नेम नाही असंच काहीसं चित्र भाईंदर मध्ये पाहायला मिळाले. लग्न सोहळ्यासाठी चक्क नवरदेव हेलिकॉप्टरने डोंबिवलीकडे (Groom travels via Helicopter) रवाना झाला आहे. यावेळी हेलिकॉप्टर पाहण्यासाठी लहान मुलांसह अनेक नागरिकांनी गर्दी केली.

नवरदेवाची प्रतिक्रीया
भाईंदर पूर्वेच्या गोडदेव गावा मधील म्हात्रे कुटुंबातील (Mhatre Wedding) रोशन म्हात्रे यांचा लग्न सोहळा डोंबिवली येथे संपन्न होणार आहे.याठिकाणी नवरदेव रोशन म्हात्रे हे खाजगी हेलिकॉप्टर मधून डोंबिवलीकडे रवाना झाले आहे. लग्न म्हटलं की खर्च खूप पण लग्नासाठी कुटुंबातील सदस्य मागे पाहत नाही तशीच प्रचिती म्हात्रे कुटूंबात पाहायला मिळाली. लग्नामध्ये अनेक नवरदेव गाडी, घोड्यावर स्वार होताना पाहत असतो. परंतु अनेक जणांचे हेलिकॉप्टरचा प्रवास करण्याचे स्वप्न असते. रोशन म्हात्रे हे मीरा भाईंदरचे माजी महापौर (Former Mayor of Meera Bhynder) स्व.तुलशीदास म्हात्रे यांचे पुतणे आहेत. म्हात्रे परिवार हे मूळ भूमिपुत्र आहेत. त्यामुळे जमिनी शेती आणि आर्थिक दृष्ट्या ही भक्कम आहेत. हेलिकॉप्टर प्रथम आमच्या गावात आल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. तर ही हेलिकॉप्टर मधून सफर करण्याची माझी आणि माझ्या बायकोची इच्छा होती. आज ती पूर्ण होण्याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया नवरदेव रोशन म्हात्रे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details