पालघर :पहिला भारतीय विमान निर्माता अमोल यादव याच्या पालघर ( केळवे रोड ) प्रकल्पासाठी ( Amol सरकारने कुठलीही जागेची मदत केली ( Govt Neglect Amol Yadav aircraft manufacturing ) नाही. त्याच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात सामंजस्य करार केला असला तरी अजूनही याबाबतची कुठलिही जमीन अथवा अनुदान अमोल यादव यांना देण्यात आलेले नाही. असे अमेल यादप यांनी सांगितले. 2016 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना पालघर तालुक्यातील केळवे येथील साधारण 157 एकर जमीन वैमानिक शास्त्रन्य अमोल यादव यांना देण्याचे नियोजन करण्यात आले होते.परंतु आज 7 वर्षे उलटूनही विमान निर्मिती करिता देण्यात आलेल्या जमिनीचा कुठलाही निर्णय न झाल्याने ( Aircraft branding Stuck in Red Tape ) अमोल यादव यांनी विमान निर्मितीचा प्रकल्प धुळे येथे दहा हजार स्केयर फुटावर सुरू करण्यात आल्याचे अमोल यादव यांनी सांगितले आहे.
Govt Neglect Amol Yadav :अमोल यादव यांच्या विमान निर्मीतीकडे शासनाचे दुर्लक्ष; देशी बनावटीच्या विमानांच्या ब्रँडिंगला लालफितीचा फटका - अमोल यादव विमान निर्मिती
देशी बनावटीच्या विमानांच्या ब्रँडिंगला लालफितीचा फटका बसला ( Govt Neglect Amol Yadav aircraft manufacturing ) आहे. भारतातील पहिल्या विमान निर्मात्याकडे शासनाचे दुर्लक्ष केल्याचे दिसत ( Aircraft branding Stuck in Red Tape ) आहे. आज 7 वर्षे उलटूनही विमान निर्मिती करिता देण्यात आलेल्या जमिनीचा कुठलाही निर्णय न झाल्याने अमोल यादव धुळे येथे दहा हजार स्केयर फुटावर भाड्याने जमिन घेतली ( Amol Yadav aircraft manufacturing in Dhule ) आहे.
विमान निर्मात्याकडे शासनाचे दुर्लक्ष : पहिला भारतीय बनावटीचे विमान निर्माता अमोल यादव याच्या पालघर (केळवे रोड ) प्रकल्पासाठी सरकारने त्याच्यासोबत मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात सामंजस्य करार केला होता. अमोलने पहिले विमान बनविण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड मेहनतीने आपली नोकरी सांभाळून विमान साकार केले होते. त्यावेळी विमान बनविण्यासाठी त्याला जागा मिळत नसल्याने त्याने राहत असलेल्या इमारतीच्या गच्चीवर ते बनविले. असे करीत असताना त्याला बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. महाराष्ट्राच्या मेक इन महाराष्ट्र कार्यक्रमात त्याच्या विमानाला जगभरातून दाद मिळाली व त्यातूनच अमोल यादव हे नाव जगासमोर ( Aircraft Manufacturer Amol Yadav ) आले. त्यानंतर त्याची मेहनत व इच्छाशक्ती पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमार्फत त्याला सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. या कार्यक्रमाच्या वेळी अमोल याच्या पहिल्या भारतीय विमाननिर्मिती कारखान्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पालघर येथील जागाही देऊ असे जाहीर केले होते.
धुळे येथे प्रकल्प सुरू : परदेशात विमान निर्मिती करता येणारा खर्च हा मोठा आहे. जर आपण हाच प्रकल्प भारतात केला तर 25 ते 40 टक्के इतकाच खर्च भारतात होईल. जेणेकरून त्याचा मोठा खर्च जो आहे तो वाचू ( aircraft manufacturing Aircraft branding ) शकतो. याचा फायदा आर्थिकदृष्ट्या भारताला होईल. असेही अमोल यादव यांनी म्हटले आहे. दरम्यान या सर्व बाबिचा विचार करता अमोल यादव पालघर तालुक्यातील केळवे येथील जमीनी बाबत अजूनही शासनाकडून कुठलिही माहिती मला देण्यात आली नसल्याचे सांगून मी माझा प्रकल्प धुळे येथे सुरू केले असल्याचे अमोल यादव यांनी सांगितले आहे. सध्या विमान निर्मिती करता शासनाकडून कुठलेही अनुदान अमोल यादव यांना देण्यात आले. नसून सध्या त्यांनी स्वखर्चातून हा प्रकल्प उभारला आहे.