महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्ह्यात १७८ प्रवासी निरीक्षणाखाली; २ प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी, ३३ प्रवाशांचा निरीक्षण कालावधी पूर्ण - Covid-19 latest updates

जिल्ह्यात १७८ परदेशी प्रवाशी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत. यातील २ प्रवाशांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आला आहेत. तर, यापैकी ३३ प्रवाशांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला असून त्यांच्यात कोरोना विषाणूचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाहीत.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना

By

Published : Mar 20, 2020, 10:08 AM IST

पालघर - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा शासनस्तरावर विविध उपाययोजना आखल्या जात आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या १७८ परदेशी प्रवासी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून २ परदेशी प्रवाशांच्या घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहेत. यापैकी ३३ प्रवाशांचा १४ दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण झाला आहे. या दरम्यान त्यांच्यामध्ये कोरोना संसर्ग झाल्याचे कोणतेही लक्षण आढळून आलेले नाही. तसेच यापूर्वी तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ११ पैकी ११ प्रवाशांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. सध्या स्थितीत जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना

कोरोना विषांणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध खाजगी आस्थापना, दुकाने, इत्यादी बाबींवर निर्बध घालण्यात आले आहेत. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी काही अत्यावश्यक खाजगी सेवा आस्थापना आवश्यकतेनुसार सुरू राहणार आहेत.

हेही वाचा -वसईत कोरोना रोगावर औषध विकणाऱ्या दोन डॉक्टरांवर कारवाई

जिल्ह्यातील मॉल, शाळा, महाविद्यालय आदि बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सर्व धार्मिकस्थळे, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळे, तरणतलाव किल्ले इत्यादी ठिकाणीदेखील ३१ मार्चपर्यंत फौजदरी प्रक्रिया संहिता 144 कलमान्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.

हेही वाचा -कोरोना इफेक्ट : डहाणूतील प्रसिद्ध 'महालक्ष्मी यात्रा' रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details