पालघर - पालघर जिल्हा बुधवारी रात्री भूकंपाच्या धक्क्याने हादरला. या हादऱ्यांमध्ये घर कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यांपासून भूकंपाचे धक्के बसत आहेत, या घटनेबाबत शासन असंवेदशील असल्याचे दिसून येत असून आणखी मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा सवाल आमदार आनंद ठाकूर केला आहे.
शासन भूकंपामुळे मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहत आहे का? आमदार आनंद ठाकूर यांचा सवाल - सवाल
मागील आठ ते नऊ महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री एकच्या सुमारास बसलेल्या धक्क्याने घर कोसळून एकाचा मृत्यू झाला. यावेळी शासन अजून मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहतय का? असा सवाल राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर यांनी उपस्थीत केला आहे.
मागील आठ ते नऊ महिन्यांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाचे सत्र सुरूच असून रात्री एकच्या सुमारास पालघर मधील डहाणू , तलासरी, बोईसर, कासा या भागात 3.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचा हादरा बसला. या हादऱ्यांमुळे अनेक घरांना तडे गेले असून नागझरी मधील बोन्डपाडा या ठिकाणी असलेल्या 55 वर्षीय रिशा मेघवाले यांच्या अंगावर त्यांच लाकडी घर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर त्यांची पत्नी किरकोळ जखमी झाली आहे.
मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या भूकंपाच्या सत्रानंतर डहाणू आणि तलासरी मध्ये एनडीआरएफ आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत टेन्ट उभारण्यात आले होते. मात्र हे टेंट सध्या काढून नेल्याने नागरिकांना आपल्या घरातच आसरा घ्यावा लागतो आहे. एका बाजूने सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि दुसऱ्या बाजूला बसणाऱ्या भूकंपाच्या हादऱ्यांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री झालेल्या भूकंपाचा हादऱ्याची तीव्रता इतकी होती की या भूकंपाचा हादरा जवळपास पन्नास किलोमीटर च्या परिसरात बसला. तर, भूकंपाचे हादरे सुरूच असून शासन अजून मोठी जीवितहानी होण्याची वाट पाहतय का? असा सवाल राष्ट्रवादीचे विधानपरिषद आमदार आनंद ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला आहे.