पालघर (वाडा) - वादळी पासात घरांचे नुकसान झालेल्या अंबिस्ते गावातील आदिवासी समाजातील ३० जणांना शासकीय मदत वाटप करण्यात आली. तहसीलदारी दिनेश कुऱ्हाडे यांच्या हस्ते दीड लाखाचे धनादेश त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात आले.
वादळी पावसात घराचे नुकसान झालेल्या आदिवासींना शासकीय मदत - पालकमंत्री
महिन्याभरापूर्वी वादळी पावसात अंबिस्ते बुद्रुक येथील आदिवासी समाजातील गावकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले होते. यावेळी पीडितांना तातडीने मदत मिळावी, म्हणून वाड्यात कार्यक्रमाप्रसंगी आलेले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या घटनेबाबत ग्रामस्थ सतीश पाटील यांनी गाऱ्हाणे मांडले होते. यावर वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी ३० नुकसानग्रस्तांना एकूण दीड लाखाच्या रक्कमेचे धनादेश वाटप केले.
यावेळी भाजपचे पालघर जिल्हा विस्तारक बाबाजी काठोळे, वाडा पंचायतीचे माजी सभापती नंदकुमार पाटील, सतीश पाटील, निलेश पाटील, मंडळाधिकारी, महसुली कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थीत होते.
महिन्याभरापूर्वी वादळी पावसात अंबिस्ते बुद्रुक येथील आदिवासी समाजातील गावकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले होते. यावेळी पीडितांना तातडीने मदत मिळावी म्हणून वाड्यात कार्यक्रमाप्रसंगी आलेले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे या घटनेबाबत ग्रामस्थ सतीश पाटील यांनी गाऱ्हाणे मांडले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी इथल्या शासकीय यंत्रणेला मदतीच्या सूचना केल्या. यावर वाडा तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी ३० नुकसानग्रस्तांना एकूण दीड लाखाच्या रक्कमेचे धनादेश वाटप केले. काही नुकसानीचे धनादेश बाबाजी काठोळे, नंदकुमार पाटील मान्यवरांच्या हस्ते आपत्तीग्रस्तांना देण्यात आले.