पालघर - एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशा आपण सोडून देतो. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का लागेल ना? असाच सुखद धक्का वसईच्या पिंकी डीकुन्हा या महिलेला मिळाला आहे. तब्बल २६ वर्षांपूर्वी ट्रेनच्या गर्दीत चोरलेली चेन पोलिसांनी तिच्या घरी आणून दिलीय.
महाराष्ट्र पोलीस रॉक्स! 26 वर्षांपूर्वी रेल्वेत चोरलेली सोनसाखळी परत मिळाली - thieves in locals
एखादी वस्तू हरवली किंवा चोरीला गेल्यास ती परत मिळवण्यासाठी कित्येक वर्ष वाट पाहावी लागते. बऱ्याचदा कंटाळून ती वस्तू परत मिळण्याची आशा आपण सोडून देतो. मात्र उशिरा का होईना चोरीला गेलेली वस्तू एक नाही, दोन नाही तब्बल २६ वर्षांनी पुन्हा मिळाली तर.. धक्का लागेल ना? असाच सुखद धक्का वसईच्या पिंकी डीकुन्हा या महिलेला मिळाला आहे.
महाराष्ट्र पोलीस रॉक्स! 26 वर्षांपूर्वी रेल्वेत चोरलेली सोनसाखळी परत मिळाली
तब्बल 26 वर्षांआधी चोरलेली सोन्याची साखळी गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईतील जीआरपी कॉन्स्टेबल मिलिंद पाटील यांनी डीकुन्हा यांच्या घरी जाऊन त्यांना सुपूर्द केली. विशेष म्हणजे या वर्षात पोलिसांनी डीकुन्हा यांना शोधायचा प्रयत्न केला होता. मात्र त्या काळात नसलेले मोबाईल फोन्स व टेक्नॉलॉजीमुळे शोध घेणे कठीण जात होते. अखेर बऱ्याच अडचणी व शोधाशोधीनंतर साखळीचा मालक सापडला, व पोलिसांनी ती चोरलेली चेन पिंकी डीकुन्हा यांना परत केली.