पालघर -वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत युवा आमदार दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा दहीहंडी उत्सव बहुजन विकास आघाडी पुरस्कृत श्रीकृष्ण जन्मोत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता.
वसई विरारमध्ये सामाजिक संदेश देत गोकुळाष्टमी साजरी
वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. २५० गोविंदा पथकांनी यात भाग घेतला होता.
वसई विरार महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. २५० गोविंदा पथकांनी यात भाग घेतला होता. ७ थरांच्या वर थर न लावता काटेकोर नियम पाळून विजेत्यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. तर येणाऱ्या पाहुण्यांना ट्रॉफी, तुळशीचे रोप देऊन 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश मंडळाने दिला आहे. तसेच पूरग्रस्तांना ४ ट्रक भरून जीवनावश्यक वस्तू रवाना केल्या आहेत.
हे मंडळ गेली ६ वर्ष आपत्तीग्रस्तांना मदत करीत आहे. यावेळी अनेक पत्रकारांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी लावण्यांचे बहारदार नृत्य सादर करण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली होती.