पालघर - माजी महापौर आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छूक असलेल्या गीता जैन यांच्या हस्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. माजी महापौरांच्या या कार्यक्रमात भाजपच्याच नगरसेविका आणि तिच्या पतीने गदारोळ घातला. यादरम्यान, माजी महापौर आणि नगरसेविका एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचा प्रकार घडला आहे.
VIDEO : मिरारोडमध्ये भाजपच्या माजी महापौर आणि नगरसेविकेत 'फ्री स्टाईल'
छत्री वाटपाच्या कार्यक्रमात स्थानिक भाजपा नगरसेविका रुपाली मोदी आणि त्यांच्या पतीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. दोघींनाही राग अनावर झाल्याने त्या एकमेकीच्या अंगावर धावून गेल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्री वाटपाच्या कार्यक्रमात स्थानिक भाजप नगरसेविका रुपाली मोदी आणि त्यांच्या पतीने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यादरम्यान, चांगलाच गोंधळ उडाला. गीता जैन आणि रुपाली मोदी यादरम्यान एकमेकींना जोरजोराने बोलत होत्या. दोघींनाही राग अनावर झाल्याने त्या एकमेकीच्या अंगावर धावून गेल्या. उपस्थितांनी हस्तक्षेप करत दोघींना बाजूला केले. परंतु, दोघींचे शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले होते. हा सर्वप्रकार पाहून स्थानिक नागरिक नगरसेविका रुपाली मोदी यांच्यावर नाराज झाले. रुपाली मोदी आमदार मेहता समर्थक आहे. मेहता आणि गीता जैन यांच्यातील असलेल्या वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे.