पालघर -वसईत नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका 18 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागला. भरागाव येणाऱ्या मोटारसायकल स्वाराने रस्ता क्रॉस करणाऱ्या तरुणीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. अल्फिया सय्यद असे मृत तरुणीचे नाव आहे.
वसईत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला मोटारसायकल स्वाराची धडक; जागीच झाला मृत्यू - वसई तरुणी अपघात न्यूज
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस एका तरुणीच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. मोटारसायकलने दिलेल्या धडकेत १८वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.
![वसईत रस्ता ओलांडणाऱ्या तरुणीला मोटारसायकल स्वाराची धडक; जागीच झाला मृत्यू Accident](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10088744-496-10088744-1609558585160.jpg)
अपघात
अल्फियाने बारावीचे शिक्षण पूर्ण केले होते. कुटुंबाच्या आर्थिक मदतीसाठी ती जॉब करायची. काल(शुक्रवार) नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सकाळी वसईच्या रेंज नाक्याजवळ कामावर जाण्यासाठी रस्ता क्रॉस करत असताना तिला मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. त्यात ती गंभीर जखमी झाली. तेथील नागरीकांनी तिला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मृत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.