महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ईव्हीएम'विरोधात घंटानाद आंदोलन - palghar collector office

'ईव्हीएम हटाव देश बचाव' अशी घोषणाबाजी करत, यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

पालघर

By

Published : Jun 17, 2019, 4:24 PM IST

पालघर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'ईव्हीएम मशीन' विरोधात भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने घंटानाद आंदोलन करून ईव्हीएम मशीनचा विरोध करण्यात आला. 'ईव्हीएम हटाव देश बचाव' अशी घोषणाबाजी करत, यापुढे होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका या ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर घेण्यात याव्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

गणेश प्रधान, जिल्हाध्यक्ष भारिप
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रतील अनेक मतदारसंघात झालेले मतदान आणि ईव्हीएमधील मतमोजणीत समोर आलेले मतदान यामध्ये तफावत असल्याचे दिसत आहे. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलेली असूनदेखील आयोगाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पालघर लोकसभा मतदारसंघातही 112 मतांची तफावत असून याबाबतची माहिती आम्हाला मिळावी, अशी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे.त्यामुळे आगामी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतपत्रिकेचा वापर करून मतदान घेतले जावे, अशी मागणी भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडीने या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details