पालघर - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रोपोलीन गॅस टँकर आणि क्रेनमध्ये भीषण अपघात झाला आहे. आंबोली परिसरातून हा गॅस टँकर गुजरातच्या दिशेने जात असताना संबंधित दुर्घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे.
अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; गॅस टँकर आणि क्रेनमध्ये धडक - palghar traffic police
अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रोपोलीन गॅस टँकर आणि क्रेनमध्ये भीषण अपघात झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असुन चौकशी करत आहेत.
वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील चौकशी सुरू आहे. या अपघातामुळे काही प्रमाणात वाहतूक विस्कळीत झाल्याने पोलिसांनी पर्यायी मार्गाने वाहने वळवली आहे. तसेच मुंबईहून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीवर देखील परिणाम झाला असून सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक संथगतीने सुरू आहे.
गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. वाहतूक पोलीस, क्रेन, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून उर्वरित कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.