महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनासाठी कार्यान्वित होणार नवा प्रकल्प - पालघर

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात 84 ग्रामपंचायती आहेत. आज या ग्रामपंचायतीकडून कचऱ्याचे ओला सुका कचरा यांचे असे व्यवस्थापन न होता त्याची एकत्रितपणे  साठवणूक केला जाते. या घनकचरऱयाचे सुनिनियोजीत व्यवस्थापन होण्यासाठी कुडूस इथल्या कोकाकोला कंपनीने प्रकल्प उभारणीच्या कामाला व त्याला अर्थसाहाय्य करणार आहे.

ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनासाठी आता व्यवस्थापन प्रकल्प होणार

By

Published : Jul 6, 2019, 3:09 AM IST

Updated : Jul 6, 2019, 12:41 PM IST

पालघर (वाडा) - वाडा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कचऱ्यासाठी नवा कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाला शीतपेय बनविणारी कोका कोला कंपनी अर्थसाहाय्य करणार आहे. कंपनी व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद पंचायत समितीला दिला जात आहे. हा प्रकल्प विविध सामाजिक संस्थांमधून राबवला जाणार आहे. या संदर्भात 5 जुलै 2019 ला वाडा पंचायत समितीच्या दालनात दुपारी दीड वाजता बैठक घेण्यात आली.

ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनासाठी होणार नवा प्रकल्प

यावेळी वाडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी राजलक्ष्मी येरपुडे, वाडा पंचायत समितीच्या सभापती अश्विनी शेळके, पालघर जिल्हा नियोजन सदस्य नंदकुमार पाटील आणि कोकाकोला कंपनीचे एच आर हिमांशू रॉय, कंपनीच्या सामाजिक उपक्रमाचे जोसेफ, रंजन खिराडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालघर जिल्ह्य़ातील वाडा तालुक्यात 84 ग्रामपंचायती आहेत. आज या ग्रामपंचायतीकडून कचऱ्याचे ओला सुका कचरा यांचे असे व्यवस्थापन न होता त्याची एकत्रितपणे साठवणूक केला जाते. या घनकचरऱयाचे सुनिनियोजीत व्यवस्थापन होण्यासाठी कुडूस इथल्या कोकाकोला कंपनीने प्रकल्प उभारणीच्या कामाला व त्याला अर्थसहाय्य करणार आहे. सामाजिक संस्थेकडून हा प्रकल्प चालवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद कंपनी मिळत आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन समितीचे सदस्य नंदकुमार पाटील यांनी दिली.

वाडा तालुक्यातील कुडूस, चिंचघर, खानिवली, खुपरी, वडवली यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीमध्ये हा प्रकल्प राबवला जाऊ शकतो. असे मत नंदकुमार पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. या प्रकल्पासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. या प्रकल्पामुळे कचरा व्यवस्थापनाबरोबर स्वच्छ भारत अभियान मोहिमेला हातभार लागणार आहे. या बरोबरच तालुका प्लास्टिक मुक्त करण्याच्या हालचाली सुद्धा वाडा पंचायत समिती कडून होत आहे.

Last Updated : Jul 6, 2019, 12:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details