महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गणरायाच्या मूर्तीची उंचीची मर्यादा ४ फूट ठेवल्याने मूर्ती व्यावसायिक संकटात; आर्थिक मदतीची मागणी

राज्य सरकारने 4 फुटाच्या गणेश मूर्ती बसवण्याची परवानगी दिल्याने मोठया आकाराच्या मूर्ती बनवणारे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

Ganesha Idol makers
गणेशमूर्ती व्यावसायिक

By

Published : Aug 2, 2020, 3:01 PM IST

पालघर-कोरोना संकट काळात विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन होणार आहे.मात्र, या गणेश उत्सवात मूर्तींची उंची ही चार फूट ठेवल्याने मुर्तिकारांना या निर्णयाचा फटका बसला आहे.पालघर जिल्ह्यातील वाडा शहरातील कैलास रसाळकर हे 11 वर्षा पासून हे मूर्ती बनविण्याचे काम करतात. शासनाच्या निर्णयाचा फटका रसाळकर यांना बसला आहे.

रसाळकर यांच्य बरोबर दहा कामगार काम करतात. त्यांनी कर्ज अथवा व्याजाने पैसे उचलून या वर्षी व्यवसाय नव्याने त्यांनी सुरू केला आहे.मात्र,कोरोना काळात राज्य सरकारने चार फूटाच्या मूर्तींना यावर्षी मान्यता देत असल्याने वर्षभरापासून तयार केलेल्या 4 फुटावरील मुर्त्या तशाच राहणार आहेत. रसाळकर यांनी तयार केलेल्या 30 हून अधिक मोठ्या मुर्त्यांसाठी खर्च केलेला पैसे वसूल होणारा नाही तसेच व्यवसाय सुरू करताना घेतलेले पैसे कसे द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबातील 20 सदस्यांचा यांचा उदरनिर्वाह कसा चालवायचा, कारागिरांच्या कुटूंबाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी कैलास रसाळकर यांनी केली आहे.

बहुतांश मूर्तिकार हे व्याजाने, उसनवारी,इतर स्त्रोत निर्माण करून अगोदर गुंतवणूक करून हा व्यवसाय करत असतात.मात्र, व्यावसायिकांना यावेळी कोरोना संकटाच्या लढाईत नुकसान सहन करावे लागत आहे.कोरोनाच्या काळात राज्य सरकारचा मूर्ती उंचीचा निर्णय हा काही गणेश मूर्ती करागीर आणि व्यावसायिकांना आर्थिक संकटात टाकणारा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details