पालघर- वाजत गाजत आलेल्या लाडक्या बाप्पांना दीड दिवस पूर्ण होताच काल (मंगळवार) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या बाप्पांचे काल पालघर येथील गणेशकुंड येथे विसर्जन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात इतरत्र कृत्रिम तलावात तसेच समुद्रात आपल्या दीड दिवसाच्या लाडक्या बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
पालघरमध्ये दीड दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप - पालघर
गणपती बाप्पा मोरया या.. पुढच्या वर्षी लवकर या..' या गजरामध्ये दीड दिवसाच्या बाप्पांचे मंगळवारी पालघर येथील गणेशकुंड येथे विसर्जन करण्यात आले.
'गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..', 'गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला', 'एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार' अशा जयघोषांसह पालघरमध्ये दीड दिवसांच्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यंदाच्या गणेशोत्सवातील पहिला विसर्जन सोहळा काल पार पडला. राज्यात सोमवारी गणरायाचे वाजत गाजत मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले होते. तर अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांच्या गणपतीचे आगमन झाले होते. मंगळवारी दुसऱ्या दिवशी दुपारनंतर दीड दिवस पूर्ण होताच या गणपती बाप्पाचे वाजत-गाजत मिरवणूक काढून, विसर्जन करण्यात आले.