पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने तीन प्रवाशांवर हल्ला करून हत्या केली. पालघरमध्ये घडलेली ही घटना अतिशय गंभीर आणि अमानवीय आहे. आज देश एका गंभीर परिस्थितीला सामोरा जात असताना तर हा प्रकार आणखी व्यथित करणारा आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरात- कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडे केली आहे.
'गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोरात-कठोर शिक्षा करावी' - devendra fadnavis on gadchinchale
जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने तीन प्रवाशांवर हल्ला करून हत्या केली.
devendra fadnavis
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे गेल्या आठवड्यात चोर असल्याचे समजून जमावाने तिघांची हल्ला करून हत्या केलीी होती. त्यानंतर अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.