पालघर -जिल्ह्यातील गडचिंचले तिहेरी हत्याकांडाच्या चौकशीसाठी सीआयडीची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे. गडचिंचले येथील घटनास्थळाची पाहणी करत टीमने पंचनामा केला आहे. यावेळी कासा पोलिसांचे पथक देखील त्यांच्यासोबत होते. या घटनेतील आरोपी जंगलात फरार असल्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.
पालघर तिहेरी हत्याप्रकरण : सीआयडीची घटनास्थळी पाहणी; ड्रोनच्या मदतीने जंगलातील फरार आरोपींचा घेणार शोध - गडचिंचले तिहेरी हत्याप्रकरण
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने इको कारने प्रवास करणाऱ्या ३ प्रवाश्यांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण हत्या केली. याचे पडसाद राज्यासह देशभर उमटले.
काय आहे प्रकरण -
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने इको कारने प्रवास करणाऱ्या ३ प्रवाशांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने हल्ला करून निर्घृण हत्या केली. याचे पडसाद राज्यासह देशभर उमटले. पालघरमध्ये घडलेल्या हत्याकांडाचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला आहे. चौकशीसाठी सीआयडी टीम गडचिंचले येथे घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी कसा पोलिसांचे एक पथक देखील त्यांच्यासोबत होते. घटनास्थळी सीआयडी टीममार्फत करून पंचनामे करण्यात आले असून याबाबत अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी या प्रकरणातील ११० जणांना अटक झाली असली तरीही अजूनही अनेकजण जंगलात फरार आहेत. या ठिकाणी जंगल घनदाट असल्याने शोध मोठे आव्हान यंत्रणेसमोर आहे. त्यामुळे आरोपींचा शोध घेण्यासाठी आता ४ ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध आता ड्रोनच्या मदतीने घेतला जाणार आहे.