महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गडचिंचले हत्या प्रकरणी १०१ आरोपींना पोलीस कोठडी, ९ अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात - palghar murdr case

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने इको कारने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केली होती. याप्रकरणी ११० आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहे.

gadchinchale incident
गडचिंचले हत्या प्रकरणी १०१ आरोपींना पोलीस कोठडी

By

Published : Apr 18, 2020, 11:29 PM IST

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर, दरोडेखोर असल्याच्या संशयावरून जमावाने इको कारने प्रवास करणाऱ्या 3 प्रवाशांची दगड, कोयते, कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केली होती. याप्रकरणी ११० आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली आहे. यापैकी ९ आरोपी १८ वर्षांखालील अपल्पवयीन असल्याने त्यांना भिवंडीच्या बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.

हत्येप्रकरणातील १०१ आरोपींना आज (शनिवार) डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्व आरोपींना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जमावात असलेले काही आरोपी अजूनही फरार असून कासा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

गडचिंचले हत्या प्रकरणी १०१ आरोपींना पोलीस कोठडी

ABOUT THE AUTHOR

...view details