महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरार येथील फर्निचर दुकान जळून खाक, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता - विरार फर्निचर दुकान आग

विरारमधील चंदनसार येथील 'क्लासिक फर्निचर' या दुकानाला काल (रविवार) रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. फटाक्याच्या ठिणगीने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

Furniture store caught fire in Virar

By

Published : Oct 28, 2019, 1:53 AM IST

Updated : Oct 28, 2019, 2:25 AM IST

पालघर - विरारमधील चंदनसार येथील 'क्लासिक फर्निचर' या दुकानाला काल (रविवार) रात्री भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व फर्निचर जळून खाक झाले आहे. फटाक्याच्या ठिणगीने ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये.

विरार येथील फर्निचर दुकान जळून खाक, फटाक्याच्या ठिणगीने आग लागल्याची शक्यता

रात्री १०.३० च्या सुमारास ही आग लागली. या घटनेची माहिती मिळताच, वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्नीशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत ही आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते.

हेही वाचा : ऐन दिवाळीत प्लास्टिक गोडाऊनला भीषण आग, बाजूची चार दुकानेही भस्मसात

Last Updated : Oct 28, 2019, 2:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details