विरार (पालघर) - विरारमध्ये चाळीत राहणाऱ्या दोन कुटुंबातील सदस्यांमध्ये जागेच्या वादातून फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
विरार पश्चिमेकडील गावठण परिसरात असलेल्या हाजी युसूफ चाळीत राहणाऱ्या गावडे व सेलिया कुटुंबीयांमध्ये हा जुना वाद असून दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये चाळीतील जागेवरून पुन्हा एकदा भांडण झाले. मात्र काही वेळातच दोन कुटुंबातील हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही कुटुंबातील महिला व पुरुष सदस्यांनी एकामेकांच्या अंगावर दगडफेक करत लाकडी दांड्यानी मारहाण केली.