वसई (पालघर) -नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा येथील उघड्या नाल्यात पडून चार वर्षीय मुलगा वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.
नालासोपाऱ्यात उघड्या नाल्यात पडून चार वर्षीय मुलगा गेला वाहून - Four-year-old boy dies in Nalasopara
वसई विरारमध्ये शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळला आहे. या मुसळधार पावसामुळे सर्व नाले तुडूंब भरून वाहत आहेत. असे असतानाच नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा येथे उघड्या नाल्यात चार वर्षीय मुलगा पडून वाहून गेला आहे.
![नालासोपाऱ्यात उघड्या नाल्यात पडून चार वर्षीय मुलगा गेला वाहून Four-year-old boy dies in Nalasopara](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-12501794-thumbnail-3x2-vasai-news.jpeg)
नालासोपाऱ्यात उघड्या नाल्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू
वसई विरारमध्ये शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. या मुसळधार पावसामुळे सर्व नाले तुडूंब भरून वाहत आहेत. असे असतानाच नालासोपारा पूर्वेतील बिलालपाडा येथे उघड्या नाल्यात चार वर्षीय मुलगा पडून वाहून गेला आहे. अमोल सिंग (४) असे या मुलाचे नाव आहे. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून मुलाचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - मुंबईत पावसामुळे 30 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून ५ लाखांची मदत