पालघर- तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जखारिया इंडस्ट्रीज या कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. या स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य पाच कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर कंपनीत आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलामार्फत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असून, सदर घटनेत चार कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळली आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील जखारिया कंपनीत स्फोट; एक ठार, पाच कामगार जखमी - tarapur midc fire
स्फोटानंतर कंपनीत आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील जखारिया इंडस्ट्रीज या कापडाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा भीषण स्फोट झाला असून तीन ते चार किलोमीटर परिसर स्फोटाच्या आवाजाने हादरला. या स्फोटानंतर कंपनीत मोठी आग लागली. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत या अपघातात एक मृतदेह हाती लागला असून पाच कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर बोईसर येथील स्टार या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.