महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारमध्ये शॉर्टसर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक; जीवितहानी नाही - चारचाकी गाडी जळून खाक

विरार पश्चिमेच्या रिलायन्स फ्रेश मॉलसमोर शॉर्टसर्किटमुळे एका आय20 कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

fire
चारचाकी गाडी जळून खाक

By

Published : Feb 8, 2021, 6:40 PM IST

पालघर/विरार-विरार पश्चिमेच्या रिलायन्स फ्रेश मॉलसमोर शॉर्टसर्किटमुळे एका आय20 कारला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. गाडीला आग लागताच चालकाने गाडीतून पळ काढला. यानंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाला पाचारण केलं. त्वरित अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

विरारमध्ये शॉर्टसर्किटमुळे चारचाकी गाडी जळून खाक

आज दुपारी 1 च्या सुमारास ही घटना घडली आहे. आग इतकी भीषण होती की संपूर्ण गाडी जळून खाक झाली व शेजारी असलेल्या एका गाडीचे देखील नुकसान झाले.

विरार पुर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डान पुलावरून प्रभाकर गडकरी हे आपल्या गावी जात असताना अचानक त्यांच्या i20 कारच्या इंजनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नेाही, पण प्रभाकर गडकरी यांची i20 कार पूर्ण जळून खाक झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details