विरार-वैतरणा जेट्टी परिसरात ( Vaitrana Jetty ) सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी नदीत पडल्याची घटना ( incident of four people falling into river ) समोर आलो आहे. या दुर्घटनेत दोघींचा बुडून मृत्यू झाला आहे.अन्य दोघी सुखरूप आहेत. तर अन्य दोघी सुखरूप पाण्याबाहेर आल्याचे सांगितले जात आहे.
Virar News : सेल्फी घेणे पडले महागात; चार जणी पडल्या नदीत, दोघींचा मृत्यू - वैतरणा जेट्टी
वैतरणा जेट्टी परिसरात ( Vaitrana Jetty ) सेल्फी काढण्याच्या नादात एकाच कुटुंबातील चार जणी नदीत पडल्याची घटना ( incident of four people falling into river ) समोर आलो आहे. या दुर्घटनेत दोघींचा बुडून मृत्यू झाला आहे.अन्य दोघी सुखरूप आहेत.
सेल्फी काढण्याच्या नादात पडल्या -विरार- पश्चिम येथील वैतरणा जेट्टी परिसरात दररोज संध्याकाळी एकाच कुटुंबातील चौघी फेरफटका मारण्यासाठी यायच्या अशी माहिती आहे. शनिवारी संध्याकाळीही त्या नेहमीप्रमाणे या ठिकाणी आल्या होत्या. मात्र सेल्फी काढण्याच्या नादात त्या खाडी पत्रात पडल्या होत्या. एकमेकींना सावरण्याच्या प्रयत्नात त्यातील एक मुलगी बुडाली आहे. तर दुसरी बेपत्ता आहे.
पोलीस घटनास्थळी - अन्य दोघी सुखरूप किनाऱ्यावर आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिका अग्निशमन दल, अर्नाळा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून; बेपत्ता विवाहितेचा शोध घेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.