महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Ahmedabad highway Accident : मुंबई अहमदाबाद महामार्गावर कार-बस अपघातात चौघांचा जागीच मृत्यू - मुंबई अहमदाबाद कार अपघात

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बस यांच्यात झालेल्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला. कार गुजरातहून मुंबईच्या दिशेने जात होती आणि कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक दिली. ही माहिती पालघर पोलिसांनी दिली.

मुंबई अहमदाबाद महामार्ग अपघात
Mumbai Ahmedabad highway Accident

By

Published : Jan 31, 2023, 8:31 AM IST

Updated : Jan 31, 2023, 9:10 AM IST

पालघर : आज पहाटे 5 वाजेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर महालक्ष्मी पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. गुजरातहून ही कार मुंबईच्या दिशेने येत होती. मुंबई अहमदाबाद महामार्गावरील महालक्ष्मी येथे पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यावेळी विरुद्ध दिशेनं येणाऱ्या भरधाव लक्झरी बसवर कार आदळली. त्यामुळे भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. या अपघातात कारमधील चारही प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.

दरवर्षी 1 हजार 960 जणांचा अपघातात मृत्यू - ओव्हर स्पिडिंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा, आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. देशात दरवर्षी साधारण 1.50 लाख वाहनचालक रस्ते अपघातांमुळे मृत्युमुखी पडतात. राज्यातील अपघातांची संख्या कमी होत नाही. 2021 मधील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत राज्यातील अपघातांमध्ये 26 हजार 284 पर्यंत वाढ झाली आहे. याशिवाय संबंधित अपघातांमध्ये 11 हजार 960 प्रवाशांचा हकनाक जीव गेला आहे. अपघातात 14 हजार 266 लोक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना त्वरित उपचार न मिळाल्यामुळे अथवा लवकरात लवकर रुग्णालयात दाखल न केल्यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

आहे.

साताऱ्यात भीषण अपघात -साताऱ्याच्या खंबाटकी बोगद्यात कारला 30 जानेवारीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जण ठार तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. गोकर्ण महाबळेश्वरची ट्रीप संपवून पुन्हा पुण्याला जात असताना हा अपघात झाला आहे. जखमींमध्ये दीड वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. चालकाला डुलकी लागल्यामुळे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी कठड्याला धडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

नांदेडमध्ये अपघातात गुणवंत विद्यार्थ्याचा अपघात - लोहा तालुक्यातील हळदव येथील 21 वर्षीय धोंडीबा केशव पवार हा मागील चार ते सहा महिन्यांपूर्वी डाक विभागाच्या परीक्षेत उतीर्ण होऊन गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याअंतर्गत डाक कार्यालयात नोकरीवर रुजू झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने धोंडीबा याने नोकरीसाठी जाहिरात निघाल्याने अर्ज करण्यास सुरुवात केली होती. अत्यंत हुशार व मनमिळाऊ असलेला धोंडीबा पवार याने इयत्ता दहावी परीक्षेत ९७ टक्के गुण संपादन करत यश मिळविले होते. मृतांमध्ये लोहा शहरानजीक हळदव येथील २१ वर्षीय तरुण डाक कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

Last Updated : Jan 31, 2023, 9:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details