विरार (पालघर) - वसई तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या वसई तालुक्यात ४ नव्या रुग्णांची वाढ झाली असून, त्यातील ३ ग्रामीण भागात तर १ रुग्ण शहरी भागात आढळून आला आहे. यामुळे एकूण १३ रूग्ण सापडले आहेत. वसई-विरार परिसरात शनिवारी चार नव्या रुग्णांची भर पडली आहे.
वसईमध्ये चार नव्याने कोरोनाग्रस्तांची वाढ; एकूण संख्या 13वर - vasai corona update
१३ रूग्णांपैकी ३ रुग्ण हे नालासोपारा राजोडी ग्रामीण भागातील आहेत. हे रुग्ण अमेरिकेच्या बोस्टन भागातून कतारमार्गे प्रवास करून आले होते. हे एकूण ५ मित्र असून, त्यातील एक पुण्याचा होता. पाचही जण आपापल्या ठिकाणी विलगीकरणात होते.
१३ रूग्णांपैकी ३ रुग्ण हे नालासोपारा राजोडी ग्रामीण भागातील आहेत. हे रुग्ण अमेरिकेच्या बोस्टन भागातून कतारमार्गे प्रवास करून आले होते. हे एकूण ५ मित्र असून, त्यातील एक पुण्याचा होता. पाचही जण आपआपल्या ठिकाणी विलगीकरणात होते. त्यातील पुण्याच्या व्यक्तीला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. यामुळे त्याची तपासणी केली असता, वैद्यकीय अहवालात त्याला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. यामुळे राजोडी येथील चारही जणांचे स्वॅब नमुने परीक्षणासाठी पाठवण्यात आले होते. शनिवारी सायंकाळी त्यातील ३ जणांचा अहवाल आला असून, त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
सध्या या रुग्णांना बोळींज येथील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तीनही रुग्ण २८ ते ३५ च्या वयोगटातील आहेत. तर प्रशासनाने राजोडी परिसर पूर्णतः बंद केला आहे. चौथा रुग्ण हा महापालिका क्षेत्रात सापडला असून, तो ताज हॉटेलमधील कर्मचारी आहे. तो नालासोपारा पश्चिम येथे राहत असून, सध्या त्याला बोळींज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या कुटुंबीयांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तो कुणाच्या संपर्कात आला, याचा तपास सुरू असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.