महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पालघरमध्ये पावसाचा जोर कायम; सूर्या नदीवरील पुलावरून चार गाई गेल्या वाहून - वैतरणा नदी

पिंजाळ व वैतरणा नदी आज(दि. 3 ऑगस्ट) सकाळी 9:30 वाजेपासून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. सूर्या नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गाई वाहून गेल्या. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांना धोका उद्भवू शकतो.

सूर्या नदीवरील पुलावरून चार गाई गेल्या वाहून

By

Published : Aug 3, 2019, 5:45 PM IST

पालघर(वाडा) -पिंजाळ व वैतरणा नदी आज(दि. 3 ऑगस्ट) सकाळी 9:30 वाजेपासून धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहे. त्याचबरोब, तानसा नदीला पूर आल्याने वाडा आणि भिवंडी तालुक्याला जोडणारा केळठण-वज्रेश्वरी पुल पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास नदीकाठच्या गावांना धोका उद्भवू शकतो.

सूर्या नदीवरील पुलावरून चार गाई गेल्या वाहून

रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्या नदीवरील धामणी धरणातून 40600 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सूर्या नदीत सुरू आहे. सूर्या नदीवरील जुन्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चार गाई वाहून गेल्या. तर, एक गाय माघारी फिरल्याने वाचली आहे.

या पावसाचा तडाखा हा पालघर जिल्ह्य़ातील पालघर, मनोर, बोईसर,डहाणू परिसराला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. डहाणू येथील इराणी रोड पाण्याखाली गेल्याने, मार्केट परिसरात पाणी साचले आहे. सूर्या नदीवरील धामणी धरन व कवडास मधून 21600 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने, कासा येथील सूर्या नदी व चारोटी येथील गुलझारी नदी दुथडी भरून वाहत आहेत. वाऱ्यासह पावसाचा जोर आद्यपही परिसरात कायम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details