पालघर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पोलीस दलाची भूमिका महत्वाची ठरत असताना विरार पोलीस ठाण्यातील 9 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित नऊ पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आहे. यात एक पोलीस अधिकारी व आठ कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विरार पोलीस ठाण्यात कोरोनाचा शिरकाव; 9 पोलीस कोरोनाबाधित, तर 45 जण होम क्वारंटाईन - विरार पोलीस ठाणे पालघर
विरार पोलीस ठाण्यातील 9 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाधित नऊ पोलिसांच्या संपर्कात आलेल्या पोलिसांना होम क्वारंटाईन करण्यात आहे. उपाययोजनेसाठी शुक्रवारी दुपारी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी सील करण्यात आला होता.
विरार शहरात गेल्या सात दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले असून आता पोलीस दलातही कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर येत आहे. कोरोनाच्या या थैमानाने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. उपाययोजनेसाठी शुक्रवारी दुपारी महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने ठाणे परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी सील करण्यात आला होता. दरम्यान दिवसभरात तक्रार तसेच इतर कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून माघारी पाठवण्यात येत होते. मात्र पोलीस ठाणे परिसर निर्जंतुकीकरण केल्यानंतर सुरळीत सुरू होणार असल्याची माहिती विरार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी दिली आहे.