पालघर - वनपट्टा जागेवर बांधबंदिस्तीसाठी परवानगी देण्यासाठी दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कासा नर्सरी ( ता. डहाणू ) येथील शिवदास सोनवणे या वनरक्षकाला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पालघर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिंपळशेत कार्यक्षेत्रातील एका गावातील आहे. वनपट्ट्याखाली वाटप केलेल्या जागेत बांधबंदसिती करण्यासाठी तक्रारदाराने शिवदास सोनवणे यांच्या परवानगी मागितली. त्यावेळी वनरक्षक सोनवणे यांनी पाहणी करुन परवानगी नाकारली. त्यानंतर सोनवणे यांनी पुन्हा तक्रारदाच्या त्या ठिकाणावर भेट देत परवानगीसाठी दहा हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.