पालघर/वाडा - पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर आल्याने विक्रमगड आणि वाडा तालुक्यांतील नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले आहे. वाडा आणि विक्रमगड तालुक्यातून या नद्या वाहणाऱ्या या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याने परिसरातील नागरिकांचे हाल होत आहेत.
वाडा व विक्रमगड तालुक्याला जोडणारा मलवाडा पूल खचल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. मलवाडा हे गावही पुराने प्रभावित झाले आहे. या गावची लोकसंख्या जवळपास दोन हजार आहे.
पालघर :पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर वाडा तालुक्यातील पाली येथील पिंजाळ नदीच्या काठी असणाऱ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारत परिसरात पाणी शिरले आहे. रविवारची सुट्टी असल्याने आज इमारतीत विद्यार्थी नव्हते. या संस्थेत 100 हून अधिक विद्यार्थी प्रशिक्षण घेतात.
पालघर :पिंजाळ, तानसा, वैतरणा नद्यांना पूर वैतरणा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने बोरेंडा व कळंभे गावातील जवळपास १८ कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्याची माहिती वाडा तहसीलदार कार्यालयातून देण्यात आली आहे. त्याचबरोबर, तानसा नदीला आलेत्या पुरामुळे सुतार पाडा, काचरे पाडा, मातेरा पाडा, गवारी पाडा, खैरेपाडा, कामडी पाडा, चौधरी पाडा अशा विविध वस्त्यांमधील जवळपास ५५० नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.