पालघर -विरार पूर्व येथील कोपरी परिसरातील 'नित्यानंद धाम' या चार मजली इमारतीचा काही भाग मंगळवारी रात्री आठच्या सुमारास कोसळला. या घटनेत भूमी विनोद पाटील या पाच वर्षीय चिमुकलीचा ढिगार्याखाली अडकल्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
विरारमध्ये अनधिकृत इमारतीचा भाग कोसळून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू - भूमी विनोद पाटील
10 वर्षे जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचा टेरेस आणि चौथ्या मजल्यावरील सज्जा रात्री आठच्या सुमारास कोसळला. या घटनेत भूमी विनोद पाटील या पाच वर्षीय चिमुकलीचा ढिगार्याखाली अडकल्याने मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -वसईतील पीएमसी बँकेच्या खातेधारकांचा 'नोटा' ला मत देण्याचा निर्णय
विरार पूर्व मधील कोपरी गावातील नित्यानंद नगर परिसरात अनेक अनधिकृत इमारती आहेत. या इमारतींपैकीच 10 वर्षे जुन्या नित्यानंद धाम या चार मजली इमारतीचे टेरेस आणि चौथ्या मजल्यावरील सज्जा रात्री आठच्या सुमारास कोसळला. कोसळलेला भाग इमारतीखालील दुचाकींवर पडला. परिणामी वाहनांचेही नुकसान झाले आहे. दुर्घटना घडली त्या वेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावर 10 कुटुंब वास्तव्यास होती. चौथ्या मजल्यावरील भाग कोसळल्याने रहिवाशांना बाहेर पडण्यास अडथळा येत होता. अग्निशमन दल येण्याआधीच स्थानिक नागरिकांनी बचावकार्याला सुरुवात केली होती. दरम्यान, शेजारील इमारतसुद्धा कोसळण्याच्या स्थितीत असल्याने या इमारतीतील रहिवाशांनादेखील तातडीने मोकळ्या मैदानात धाव घेतली होती.