पालघर - समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने ५ जणबुडाल्याची घटना घडली आहे. अर्नाळा समुद्र किनारी दुपारी ३ वाजता हा अपघातघडला. बुडालेल्यांमध्ये १ पुरूष आणि ४ महिलांचा समावेश आहे. हे सर्व वसई अंबाडी येथील असल्याची माहिती मिळते आहे.
वसई अर्नाळाचे अप्पर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांच्यासह पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. ५ जणांपैकी एकाचा मृतदेह सापडला असूनउर्वरीत ४ जणांचा शोध पालघर जिल्हा पोलीस दलांच्या स्पीड बोटमधून चालू आहे.