पालघर - 'क्यार'नंतर आता 'महा' चक्रीवादळाचे संकट राज्यावर घोंगावत आहे. 'महा' चक्रीवादळाच्या भीतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त मच्छीमारांच्या मासेमारी बोटी पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी आश्रयाला आल्या आहेत.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारी बोटी डहाणू समुद्रकिनारी आश्रयाला; महा चक्रीवादळाचा प्रभाव - मासेमारी बोटींवर महा चक्रीवादळाचा प्रभाव
'महा' चक्रीवादळाच्या भीतीने रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त मच्छीमारांच्या मासेमारी बोटी पालघर जिल्ह्यातील डहाणू समुद्रकिनारी आश्रयाला आल्या आहेत.

डहाणू समुद्रकिनारा
रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारी बोटी डहाणू समुद्रकिनारी आश्रयाला
हेही वाचा- उजनी जलाशयातून ढोकरी ते शहा प्रवासी बोट सुरू
अरबी समुद्रातील 'महा' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये वादळी-वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या काही दिवसांत समुद्र खवळलेला असेल. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी ऐनवेळी डहाणू बंदरात आश्रय घेतला आहे. बोटींतील सर्व खलाशी सुखरूप आहेत.