पालघर - डहाणू तालुक्यातील आगर येथील मच्छीमार प्रवीण दामोदर माच्छी यांच्या बोटीला समुद्रात अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी बोटीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.
मासेमारीसाठी गेलेल्या बोटीला अचानक लागली आग

डहाणू तालुक्यातील आगर येथील मच्छिमार प्रवीण दामोदर माच्छी यांची वृंदावन प्रसाद ही मासेमारी बोट शुक्रवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेली होती. मात्र, या दरम्यानच या बोटीला अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच अदानी औष्णिक वीज प्रकल्पाच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व बोट किनार्यावर येताच पंधरा ते वीस मिनिटात ही आग विझवण्यात आली.
जीवितहानी नाही, बोटीचे मोठे नुकसान
या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बोटीचे इंजिन, मासेमारीसाठी असलेली जाळी, अंतर्गत भागातील सर्व सामान जळून खाक झाले असून सुमारे 6 लाख 73 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. डहाणूचे तहसीलदार राहुल सारंग आणि संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून फिशरीज विभागाच्या परवाना अधिकारी प्रियंका भोये यांनीही घटनास्थळी भेट दिली.
TAGGED:
Palghar fishing boat fire