महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना : मच्छीमार, खलाशांना नागोळ, उमरगाव दरम्यानच्या खाडीत उतरवले - latest palghar news

२५ मार्च २०२० च्या सूचनेनुसार सरहद्द बंद करण्यात आल्यामुळे या खलाशांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे पालघर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पालघर
पालघर

By

Published : Apr 5, 2020, 8:55 PM IST

पालघर - जिल्ह्यातील तलासरी आणि डहाणू तालुक्यातील आणि गुजरात, दादरा-नगर-हवेलीमधील २३ बोटींमधील जवळपास १७०० ते १८०० खलाशांना दक्षिण गुजरातमधील स्थानिक मच्छीमारांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता. मात्र, गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नागोळ व उमरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवले आहे.

गुजरातमधील उंबरगाव येथे उतरवून त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि कॉरंटाईन न करता घरी जाण्यासाठी सोडण्यात आले. यामधील ३०० ते ४०० खलाशी हे डहाणू आणि तलासरी तालुक्यातील असल्याची माहिती आहे. २५ मार्च २०२० च्या सूचनेनुसार सरहद्द बंद करण्यात आल्यामुळे या खलाशांना महाराष्ट्रात प्रवेश दिला जाणार नसल्याचे पालघर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. यामुळे आता या खलाशांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details