महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव; मच्छिमार चिंताग्रस्त, इतर जैवविविधता धोक्यात येण्याची भीती - कोकण मासेमारी व्यवसाय न्यूज

वसईसह पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव खाडीपात्रात जाळे टाकून मासेमारी करतात. परंतु, काही दिवसांपासून या येथे मासेमारी करत असताना जाळ्यात जेलिफिश मासे येऊ लागले आहेत. हे दिसायला आकर्षक वाटत असले, तरी ते घातक असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे. त्यांच्यामुळे नियमित मिळणाऱ्या माशांची आवक घटली आहे. जेलिफिशचे संकट असेच राहिले तर येत्या काळात मच्छीमारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव
खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव

By

Published : Oct 16, 2020, 1:02 PM IST

पालघर/वसई - मागील चार ते पाच दिवसांपासून वैतरणा, चिखलडोंगरी यासह इतर ठिकाणच्या खाडीपात्रात पारदर्शक प्लास्टिक पिशवीसारख्या दिसणाऱ्या जेलिफिश प्रजातीचे मासे आढळत आहेत. हे जेलिफिश मोठ्या प्रमाणावर जाळ्याला लागून येत आहेत. त्यामुळे इतर मासे मिळत नसल्याने मच्छीमार बांधवांनी चिंता व्यक्त केली आहे.

खाडीपात्रात जेलिफिशचा शिरकाव
वसईसह पालघर जिल्ह्यात मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव खाडीपात्रात जाळे टाकून मासेमारी करतात. परंतु, मागील काही दिवसांपासून या खाडीपात्रात मासेमारी करत असताना जाळ्यात जेलिफिश मासे येऊ लागले आहेत. जरी हे जेलिफिश दिसण्यासाठी आकर्षक वाटत असले, तरी ते घातक असल्याचे मच्छीमार बांधवांनी सांगितले आहे. खाडीच्या पात्रात पांढऱ्या रंगाचे जेलिफिश सापडत आहेत. या जेलिफिशचा मोठा परिणाम हा स्थानिक मच्छीमारांच्या मासेमारीवर होऊ लागला आहे. यामुळे ऐन मासेमारीचा हंगामात असा अडथळा निर्माण झाल्याने चिंता वाटत आहे, असे मच्छीमार सतीश गावड यांनी म्हटले आहे.
समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीमुळे व हे जेलिफिश खाडीपात्रात आले असल्याचा अंदाज मच्छीमारांची वर्तविला आहे. विशेष करून वैतरणा खाडी, चिखलडोंगरी, अर्नाळा खाडी किनारा, टेम्भीखोडावे या आजूबाजूच्या खाडीपात्रात हे मासे आहेत. हे जेलिफिश पांढऱ्या रंगाचे असून फुग्यासारखे शरीर असलेले आहेत. हे साधारण एक किलो व त्याहून अधिक वजनाचे आहेत. जेलिफिशने एखाद्याला डंख केल्यास व शरीराच्या इतर भागाला जरी त्याचा स्पर्श झाला, तरीही खाज सुटते आणि त्या ठिकाणी लाल रंगाचे व्रण उठत आहेत. हे मासे जाळ्यात येत असल्याने जाळ्यांचेही मोठे नुकसान होऊ लागले आहे. एका-एका वेळेला साधारणपणे ३० ते ३५ हे जेलिफिश जाळ्याला लागून येत असल्याने त्यांना काढण्यातच मच्छीमारांचा वेळ जात आहे. आधीच करोनाच्या संकटाने अडचणी निर्माण अनेक झाल्या आहेत. त्यात आता या जेलिफिशचे संकट असेच राहिले तर, येत्या काळात मच्छिमारांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
माश्यांची आवक कमी

खाडीपात्रात जेलिफिश माश्यांचा शिरकाव झाला आहे. तेव्हापासून इतर प्रजातीचे मासे हे खाडीपात्रातून गेले आहेत. याचाच परिणाम हा मच्छीमार बांधवांच्या मासेमारीवर झाला आहे. जेलिफिशमुळे समुद्रात मिळणारे मासे, ज्यावर या बांधवांचा उदरनिर्वाह चालतो तेच मासे कमी प्रमाणात झाले आहेत. त्यामुळे नियमितपणे मिळणाऱ्या माशांची आवक घटली असल्याचे मच्छिमार बांधवांनी सांगितले. जेलिफिशमुळे नुकसान व त्रास होत असल्याने काही मच्छीमार आता मासेमारीसाठी सुद्धा जात नाहीत.

जेलिफिश घातकच

  • सध्याच्या स्थितीत वैतरणा खाडीपात्रात आढळून आलेला जेलिफिश हा 'बॉक्स जेलिफिश' असून हा सुद्धा अतिशय घातक माशांच्या प्रजातीपैकी आहे.
  • वातावरणातील बदलामुळे किंवा समुद्राच्या पाण्यात शेवाळ अधिक वाढल्यास जेलिफिशसारख्या प्रजातींची अधिक वाढ होते. हे जेलिफिश इतर छोट्या-छोट्या माशांना खाऊन टाकतात. त्यामुळे याचा जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
  • जेलिफिशने दंश केल्यास आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी खाद्यपदार्थात वापरले जाणारे व्हिनेगर यावरील उत्तम उपाय आहे. दंश झालेल्या ठिकाणी तत्काळ लावल्यास वेदना कमी होऊन आराम मिळतात, असे पालघर येथील प्राणीजीवशास्त्र अभ्यासक प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले आहे.
  • जिल्ह्यात येत्या काळात प्रकल्प सुरू होतील. त्यावेळी मोठ्या प्रमाणात बाहेरून जहाजे येथे येतील. तेव्हा त्यामध्ये असलेले ब्लास्ट वॉटर येथील पाण्यात खाली केले जाईल. त्या पाण्यात असलेले सूक्ष्मजीवही यात येतील. त्यामुळे इतर माशांची पैदास होऊन भविष्यात त्याचा परिणाम स्थानिक मच्छिमारांच्या मासेमारीवर होऊ शकतो, असे प्रा. भोईर यांनी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details