पालघर -नालासोपारा पूर्वेकडील नालासोपारा फाटा थर्माकोल कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम वसई-विरार महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान करत आहेत.
नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू - palghar fire news
नालासोपारा पूर्वेकडील थर्माकोल कंपनीला आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्नीशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.
![नालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू spot image](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9382399-174-9382399-1604149981235.jpg)
आगीचे छायाचित्र
आगीचे दृश्य
नालासोपारा पेल्हार विभागात अनेक अनधिकृत गाळे असून सुरक्षिततेची नियमावली पायदळी तुडवून कंपन्या सुरू आहेत. त्याकडे औद्योगिक सुरक्षा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. ही आग नेमकी कशाने लागली हे समजू शकले नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान अथक परिश्रम करत आहेत.
हेही वाचा -हैदराबादच्या सोने व्यापाऱ्याची मुंबईत फसवणूक; एकाला अटक