पालघर -तारापूर औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला भीषण आग लागली आहे. मोगळ्या जागेत असलेले पाईपही या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आहेत. यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात लागलेली आग नियंत्रणात, सुदैवाना जीवित हानी नाही - तारापूर औद्योगिक क्षेत्र बातमी
तारापूर औद्योगिक क्षेत्रात रस्त्यावर उभ्या असलेल्या टँकरला भीषण आग लागली आहे. मोगळ्या जागेत असलेले पाईपही या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. अग्निशमन दलाने तीन वाहन पाण्याचा मारा केल्यानंतर ती आग आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनी शेजारी उभ्या असलेल्या एका केमिकल टँकरने अचानक पेट घेतला. त्यानंतर मोकळ्या जागेत असलेल्या पाईपलाही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन वाहने घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केला. पाण्याचा फरावा केल्यानंतर आगी आटोक्यात आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. याप्रकरणी अधिक तपास बोईसर पोलीस करीत आहेत.
हेही वाचा -पालघरच्या ग्रामीण भागातील रुग्णांची फरफट थांबणार, अलर्ट सिटीझन फोरमने दिल्या दुचाकी रूग्णवाहिका