पालघर- नालासोपारा पूर्वेकडील आशीर्वाद इमारतीच्या बाजूला असलेल्या जाधव मार्केटमधील दुकानांना सकाळी पाचच्या सुमारास आग लागली. या आगीत चपला, बॅग, मोबाईल कव्हरची १४ दुकाने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होऊन आग विझवली.
नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला आग; १४ दुकाने जळून खाक - पालघर
या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मार्केटमधील दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
नालासोपाऱ्यातील जाधव मार्केटला आग
नालासोपारा पूर्वेकडील आशीर्वाद इमारतीच्या बाजूला असलेल्या जाधव मार्केटमधील दुकानांना सकाळी पाचच्या सुमारास अचानक आग लागली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ याची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत या आगीत चपला, बॅग, मोबाईल कव्हर आदी दुकाने जळून खाक झाली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मार्केटमधील दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Last Updated : Jun 2, 2019, 11:18 AM IST