महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरारच्या 'एचडीआयएल' कंपनीमागे आग - fire in palghar

पूर्वेकडील चंदनसार येथील एचडीआयएल कंपनीच्या मागील मोकळ्या जागेत मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही जागा मोकळी आणि डोंगराळ असल्याने आगीने पेट घेतला.

palghar
विरारच्या 'एचडीआयएल' कंपनीमागे आग

By

Published : Jan 14, 2020, 6:00 PM IST

Updated : Jan 14, 2020, 6:06 PM IST

पालघर - विरार पूर्व चंदनसार येथील 'एचडीआयएल' कंपनीच्या मागील मोकळ्या जागेत आग लागल्याची घटना घडली. यामध्ये सुकलेले गवत आणि काही झाडांनी पेट घेतला. वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले.

विरारच्या 'एचडीआयएल' कंपनीमागे आग

हेही वाचा -'नरेंद्र मोदींची शिवाजी महाराजांसोबत तुलना केल्याचे माहिती नाही'

पूर्वेकडील चंदनसार येथील एचडीआयएल कंपनीच्या मागील मोकळ्या जागेत मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. ही जागा मोकळी आणि डोंगराळ असल्याने आगीने पेट घेतला. स्थानिकांनी याबाबतची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन विभआगाला दिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुमारे दीड तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

हेही वाचा -जिवदानी गडावर तोल जाऊन दोन मजूर ठार

दरम्यान, कंपन्यांमधील कचरा प्रक्रिया न करताच कंपनीच्या बाहेर मागील बाजूस टाकला जातो. त्यामुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Last Updated : Jan 14, 2020, 6:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details