पालघर - तारापूर औद्योगिक क्षेत्रातील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीत आग लागल्याची घटना घडली आहे. कंपनीत लागलेल्या आगीत एक कामगार जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी बोईसर येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर एन 128 येथील बजाज हेल्थकेअर लिमिटेड कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे. त्यानंतर लगेचच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या व काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.
एक कामगार जखमी -