महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर दिंडोरी पोलीस ठाण्यात 'त्या' कंपनीविरोधात गुन्हा दाखल - fir on chemical company in palghar

पालखेड एमआयडीसीमधील पीपीई या औषध निर्मिती कंपनीत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. कंपनी सुरूच राहिली. कर्मचारी कंपनीच्या बसेसने नाशिक येथून ये-जा करीत राहिले.

fir on chemical company in palghar
fir on chemical company in palghar

By

Published : Jul 30, 2020, 1:26 PM IST

दिंडोरी ( नाशिक ) - तालुक्यातील पालखेड एमआयडीसीतील कोरोना विषाणूचे तपासणी किट व पीपीई किट तयार करणाऱ्या कंपनीत कोरोनाचा संसर्ग वाढण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानंतर कंपनीच्या व्यवस्थापनाविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार बोरसे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना ही माहिती दिली.

दिंडोरी तालुक्यात कंपनी व्यवस्थापनाविरूद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर पारदर्शक कार्यपद्धतीमुळे पोलीस, महसूल प्रशासनाचे कौतुक होत आहे, तर दुसरीकडे आर्थिक हव्यासापोटी हलगर्जीपणा करणाऱ्या सर्वच कंपन्यांचे धाबे दणाणले आहे.

पालखेड एमआयडीसीमधील पीपीई या औषधनिर्मिती कंपनीत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलीस यंत्रणा यांनी कंपनी व्यवस्थापनाला सूचना दिली होती. कंपनी सुरूच राहिली. कंपनी बसेसने कर्मचारी नाशिक येथून ये-जा करीत राहिले. कंपनी व्यवस्थापनाने कामगारांच्या बसमध्ये तसेच प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन केले नाही. कंपनीचे उत्पादन वाढवण्यासाठी कामगार काम करत राहिले. परिणामी ४४ कामगार बाधित झाले.

शासनाचे नियम, आदेशाचे पालन न करता हयगय करत संक्रमण वाढण्यास जबाबदार धरत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र रसाळ, प्रवीण भोळे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी जबाबदार व्यवस्थापनाविरोधात साथरोग प्रतिबंध, कोविड- १९ उपाययोजना, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड आदी करत आहेत.

लखमापूर फाटा येथील एक नामांकित पत्रे तयार करणाऱ्या कंपनीत ४७ कामगार ही व्यवस्थापनाच्या निष्काळजीपनामुळे बाधित झाले आहे. त्यात पत्रे वाहतूक करताना वाहनचालक यांची खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती वाढली आहे. त्या पत्रा तयार करणाऱ्या कंपनी व्यवस्थापनाविरोधातही गुन्हा दाखल का होत नसल्याची चर्चा नागरीक करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details