पालघर - बोईसर येथील चित्रालय परिसरात दोन गटांमध्ये पैशांच्या वादातून तुंबळ हाणामारी झाली आहे. बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
बोईसर येथील चित्रालय परिसरात दोन गटांमध्ये पैशाच्या वादातून तुंबळ हाणामारी - चित्रालय परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी
बोईसर येथील चित्रालय परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रालय येथील मारुती ज्वेलर्समध्ये दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. पैसे आणि सोन्याच्या व्यवहारावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे
बोईसरात हाणामारी
बोईसर येथील चित्रालय परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रालय येथील मारुती ज्वेलर्समध्ये दोन गटांमध्ये ही हाणामारी झाली. पैसे आणि सोन्याच्या व्यवहारावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दुकानाशेजारी असलेल्या एका नागरिकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा हाणामारीचा व्हिडिओ कैद केला. दरम्यान, बोईसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.