पालघर -विद्युत तारेचे स्पार्किंग होऊन, 5 एकर माळरान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतात असलेली आंबा आणि काजूची झाडे जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातल्या ओंदे गावात घडली.
विद्युत वाहिनीचे स्पार्किंग होऊन शेताला आग, आगीत आंबा, काजूची झाडे जळाली - Palghar Latest News
विद्युत तारेचे स्पार्किंग होऊन, 5 एकर माळरान जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये शेतात असलेली आंबा आणि काजूची झाडे जळाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातल्या ओंदे गावात घडली.

पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातील ओंदे गावात गजानन पाटील यांनी आपल्या शेतात आंबा आणि काजूंच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र विद्युत तारेचे स्पार्किंग होऊन त्यांच्या शेताला आग लागली. या आगीत त्यांच्या शेतात असलेली 50 अंब्यांची झाडे, तसेच काजूची झाडे जळून खाक झाली. यामध्ये गजानन पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान उघड्यावर असलेल्या या विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी वारंवार महावितरणकडे करण्यात आली होती. मात्र महावितरणने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच यापूर्वी देखील परिसरात अनेकवेळा अशा घटना घडल्याचेही पाटील यांनी सांगितले.