पालघर (वाडा)- हवामान खात्याकडून येत्या काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या पावसामुळे कापणी योग्य तयार झालेल्या भातपिकाची नासाडी होईल, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया पालघर जिल्ह्यात दरम्यानच्या काळात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. विज कोसळण्याच्या घटनाही वाडा तालुक्यात घडत होत्या. सकाळपर्यंत कडक उन्ह आणि सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत पावसाची दमदार हजेरी असे हवामान आहे. त्यामुळे कापणी योग्य झालेल्या भातपिकाची या पावसाने नासाडी होऊ शकते, अशी भीती शेतकरी वर्गाला सतावू लागली आहे. वाडा तालुक्यात 14 हजारांहून 800 हेक्टरी क्षेत्र भातपिक लागवडी खाली आहे.
हेही वाचा- डहाणू परिसरात पुन्हा भूकंपाचा धक्का; 3.4 रीश्टर स्केलची नोंद
हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भातपिकाचे नुकसान होण्याच्या मार्गावर आहे. भातपिकाने बहरलेले शेती वादळी वाऱ्याने आडवी होऊन तिची नासाडी होईल, अशी शेतकऱ्यांना भिती आहे. भातपिकं आता कापणीला आलीत. पावसाची स्थिती जर कायम राहिली तर भातकापणी करायची कशी आणि कापणी केलेले भात पिक सुकवायचे कसे, असा प्रश्न शेतकऱयांना पडला आहे. भात पिकाची अन्नप्रक्रिया होत भाताच्या गाभ्यात पाणी गेले तर भाताचा दाणा तयार व्हायला अडचण निर्माण होईल.
हेही वाचा- ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे विरारमधील १०० कुटुंब अंधारात; महावितरणकडून चालढकल