नालासोपारा - बापानेच आपल्या पोटच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तसेच, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्यसनाधीन मुलाला वडिलांनी संपवले, नालासोपाऱ्यातील घटना - पालघर क्राईम न्यूज
आमीन हा लहानपणापासून काम करत नव्हता. तो दहावी नापास होता. बेरोजगार होता. लॉकडाऊनमध्ये हे कुटुंब घरीच होते. आमीनला त्याचे वडील व त्याचा भाऊ घरात असलेले आवडत नव्हते. तो नेहमी त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगून स्वतः घरात राहायचा. तो व्यसनाधीनही झाला होता. त्याच्यावर उपचारही चालू होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
पोलीस कर्मचारी श्रीरंग गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपारा पश्चिमेकडील युनिक इमारतीमध्ये फजामिया शेख 54 हा आपल्या परिवारासोबत आमीन व अश्रफ या मुलांसोबत राहत आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास लहान मुलगा बाहेर जेवण आणण्यासाठी गेला होता. तेव्हा फजामिया शेख व आमीन दोघेच घरी होते. पाणी भरत असताना दोघांमध्ये बोलाचाली झाली त्यामध्ये यांच्यात किरकोळ भांडण झाले. यातून झटापटी झाली फजामिया याने आमीनची गळा दाबून हत्या केली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे . याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात फजामिया शेख याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमीन हा लहानपणापासून काम करत नव्हता. तो दहावी नापास होता. बेरोजगार होता. लॉकडाऊनमध्ये हे कुटुंब घरीच होते. आमीनला त्याचे वडील व त्याचा भाऊ घरात असलेले आवडत नव्हते. तो नेहमी त्यांना बाहेर जाण्यासाठी सांगून स्वतः घरात राहायचा. तो व्यसनाधीनही झाला होता. त्याच्यावर उपचारही चालू होते, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी नालासोपारा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन फजामिया याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू आहे.