महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आश्रमशाळेकरता जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना सात वर्षांपासून मोबदल्याची प्रतिक्षा - आदिवासी आश्रमशाळा न्यूज

शेतकऱ्याने मोबदल्याकरिता वारंवार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला अर्ज करूनही यावर काही ठोस उत्तर दिलेले नाही. त्यामुळे जागेचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी लढा अजून चालतच राहणार असल्याचे शेतकरी हरिचंद्र पाटिल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

आदिवासी आश्रमशाळा
आदिवासी आश्रमशाळा

By

Published : Feb 4, 2021, 9:31 PM IST

Updated : Feb 4, 2021, 9:44 PM IST

पालघर - आदिवासी आश्रमशाळेकरता जागा देणारे जिल्ह्यातील शेतकरी मोबदल्यापासून वंचित राहिले आहेत. शेतकरी हरिचंद्र पाटील यांनी जिल्ह्यातील गारगाव येथील आदिवासी विकास विभाग जव्हार प्रकल्पाअंतर्गत माध्यमिक व उच्चमाध्यमिक शासकीय आश्रमशाळेला जागा दिली. मात्र, त्यांना मोबदला मिळावा, यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.

शेतकऱ्याने मोबदल्याकरिता वारंवार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला अर्ज करूनही यावर काही ठोस उत्तर दिलेले नाही. त्यामुळे जागेचा मोबदला मिळावा, या मागणीसाठी लढा अजून चालतच राहणार असल्याचे शेतकरी हरिचंद्र पाटिल यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांना सात वर्षांपासून मोबदल्याची प्रतिक्षा



पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गारगाव या आदिवासी बहुल वस्तीभागात जव्हार प्रकल्प अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहे. या
गारगाव गावातील हरिचंद्र पाटिल यांंच्या 1 हेक्टर 38 गुंठे जागेत शाळा सुरू करण्यात आली आहे. तसेच या हरिचंद्र पाटील या शेतकऱ्यासह इतर दोन शेतकऱ्यांची जागा शाळेच्या बांधाकामात गेल्याचे हरिचंद्र पाटील यांनी सांगितले. पालघर जिल्ह्यात अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाची मुले ही येथे शिक्षण घेत आहेत. या शाळेत सुमारे 400 विद्यार्थी पट संख्या आहे.

हेही वाचा-एलआयसीचा आयपीओ दिवाळीत खुला होणार

आश्रमशाळेला जागा मात्र शेतकरी मोबदल्यापासून वंचित...

गेल्या सात वर्षांपासून मोबदला मिळावा म्हणून शेतकरी हरिचंद्र पाटिल यांचा आदिवासी विकास प्रकल्प जव्हार यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे. मात्र अजुन त्यांना या जागेचा मोबदला मिळाला नाही. शाळेच्या काही भागाच्या जमिनीचा सातबारा शेतकरी पाटील यांच्या नावाचा आहे.

हेही वाचा-सेबीकडून किशोर बियानीसह त्यांचे बंधु अनिल यांच्यावर एका वर्षाची बंदी

मोबदला मिळावा म्हणून हा लढा कायम ठेवणार...
आश्रमशाळेच्या जागेचा मोबदला मिळावा म्हणून शेतकरीवर्गाने अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र, अजून या शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागणीची आदिवासी विकास विभागाकडून दखल घेण्यात आली नाही.

Last Updated : Feb 4, 2021, 9:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details