पालघर -चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी 8 हजार रुपये अनुदान दिले जात आहे. अधिकाधिक क्षेत्राचे नुकसान झाले असेल, तर 16 हजारांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र, पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून विमा कंपन्या अतिशय कमी रक्कम देत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.
पिकविम्याचा परतावा देताना कंपन्या फसवणूक करत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप हेही वाचा...केवळ ओबीसी नाही तर प्रत्येक जातीची जनगणना झाली पाहिजे..
शेतकरी आपल्या लागवड क्षेत्रातील पिकाचा विमा उतरवत असतो. पिकाचे नुकसान झाल्यास भरपाई मिळेल. आपले आर्थिक गणित न बिघडता खर्च भरुन निघेल, अशी त्याला आशा असते. मात्र, विमा कंपन्यांनी प्रती हेक्टरी 43 हजार 500 रुपयांचा पीकविमा असतानाही प्रती हेक्टरी 8 हजार ते 10 रुपये नुकसानभरपाई दिल्याचे दिसत आहे. ही रक्कम अतिशय कमी असल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. त्यामुळे शासनाने विमा कंपन्यांवर दबाव आणून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा...निष्ठेला सलाम ! आठ महिन्याच्या गर्भवती असूनही नमिता मुंदडा मतदार संघाच्या प्रश्नांसाठी विधानसभेत
वाडा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व इतर बँकांत एकूण 3 हजार 141 शेतकरी लाभार्थ्यांची यादी आणि त्यांची रक्कम पाठवण्यात आली आहे. त्यापैकी 2 कोटी 26 लाख 19 हजार 952 रुपये वाटप करण्यात आले आहे. पीकविम्याची रक्कम जाहीर केली आहे. असे असतानाही ही रक्कम कमी असल्याचे सांगत शेतकरी वर्गात नाराजी आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला त्या शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून व्यवस्थीत परतावा दिला जात नाही, अशी तक्रार शेतकरी करत आहेत.