पालघर -राज्यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केले या नुकसानीची झळ ही पालघर जिल्ह्यातील भात पिकालाही बसली आहे. लोक प्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. पण, शेतकरी मात्र मदतीची अपक्षा करत आहे.
परतीच्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड, वाडा, सफाले, मोखाडा, जव्हार या भागातील भात पिकांचे 1500 हेक्टरहून अधिक क्षेत्र भात पिकाचे नुकसान झाले, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.