पालघर- राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरच्या भरारी पथकाने मोखाडा येथे 11 लाख रुपये किमतीची दमण, दादरा-नगर-हवेली बनावटीची अवैद्य दारू व ट्रक असा एकूण 31 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
मोखाडा येथे अवैध दारू जप्त, 31 लाखांच्या मुद्देमालासह दोघे ताब्यात - मोखाडा येथे अवैध दारू जप्त
ट्रकच्या हौद्यामध्ये विशेष कप्पे करून त्यातून दारुची तस्करी करणाऱ्या एका ट्रकला पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यातून 11 लाख रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघरचे भरारी पथक मोखाडा येथे गस्त घालत असताना ट्रकची (जी ए 01 ए यु 4457) झडती घेतली. त्यावेळी या ट्रकमध्ये विशिष्ट प्रकारचे सहा-सात छुपे कप्पे तयार करून त्यात दमण, दादरा-नगर-हवेली बनावटीची अवैद्य दारू आढळून आली. या ट्रकमधून 11 लाख रुपये किमतीचे एकूण 191 बॉक्सचे दारू आणि 20 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 31 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल पालघर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केला आहे. दारूची अवैद्य वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - पतंग पकडण्याच्या नादात पाण्याच्या टाकीत पडून ४ वर्षीय बालकाचा मृत्यू