पालघर : तलासरी तालुक्यातील कोचाई रस्त्यावरून दमण बनावटीची दारुची वाहतूक (Transportation of counterfeit liquor) केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोचाई रस्त्यावर मशनपाडा परिसरात सापळा रचण्यात आला होता. यावेळी एका हुंडाई सेंन्ट्रो कारची तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असेलला तसेच दादरा ॲन्ड नगर हवेली-दमण बनावटीचा विदेशी बिअरचा साठा (seizure of stocks of foreign beer) वाहतूक करताना आढळून आला. मद्यसाठा आणि कार मिळून चार लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (suppression of traffic of fake liquor) (Excise Department Action on Counterfeit Liquor)
Excise Department Action : दमन बनावटीच्या दारुसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; 4 लाख 36 हजारांचा मुद्देमाल जप्त
तलासरी तालुक्यातील कोचाई रस्त्यावरून दमण बनावटीची दारुची वाहतूक (Transportation of counterfeit liquor) केली जाणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या (Excise Department) भरारी पथकाला मिळाली होती. त्यानुसार कोचाई रस्त्यावर मशनपाडा परिसरात सापळा रचण्यात आला होता. यावेळी एका हुंडाई सेंन्ट्रो कारची तपासणी केली असता कारमध्ये महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असेलला तसेच दादरा ॲन्ड नगर हवेली-दमण बनावटीचा विदेशी बिअरचा साठा (seizure of stocks of foreign beer) वाहतूक करताना आढळून आला. (suppression of traffic of fake liquor) (Excise Department Action on Counterfeit Liquor)
कारचालक घटनास्थळावरून फरार-कारवाई दरम्यान कारचालक घटनास्थळावरून पळून गेल्याने कार चालकास फरार घोषित करण्यात आले आहे. कार चालकाविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा, 1949 चे कलम 65 (अ) (ई) 98 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध घेतला जात आहे. ही कारवाई उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम, उप अधीक्षक बाबासाहेब भूतकर यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाचे निरीक्षक शंकर आंबेरकर निरीक्षक यांच्या नेतृत्वात दुय्यम निरीक्षक पांडुरंग पडवळ आणि पथकातील जवानांनी केली आहे.
जप्त करण्यात आलेला मद्यसाठा-
1) किंगफिशर तीव्र बिअर 500 मिलि च्या 240 सीलबंद टिन
2) किंगफिशर सौम्य बिअर 500 मिलिच्या 360 सीलबंद टिन
3) एकूण 600 सीलबंद टिन ( एकुण 25 बॉक्स )
4) 300 बल्क लिटर.
5) काळ्या रंगाची हुंडाई सन्ट्रो कार(MH04BQ6853)
अशा प्रकारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.